आज आपण पाहणार आहोत कापसाची अशी वाणं जी लवकर काढणीला येतात, म्हणजेच 140 ते 160 दिवसांच्या आत कापूस तयार होतो आणि दिवाळीपर्यंत वेचणी शक्य होऊ शकते.

1. राशी 779
हे वान अत्यंत जबरदस्त मानले जाते. सुमारे 145 ते 150 दिवसांच्या आत याचे बोंड फुटतात आणि कापूस वेचणीसाठी तयार होतो. या वानाची विशेष बाब म्हणजे हे मध्यम तसेच हलक्या जमिनीत सुद्धा यशस्वीरित्या लागवड करता येते. तसेच भारी काळ्या जमिनीत देखील हे वान चांगले उत्पादन देते.
2. यूएस ग्रीन सीड्स – 7067
हे वान सुद्धा 140 ते 145 दिवसांच्या आत काढणीस येते. सध्याच्या काळात हे सर्वात लवकर काढणीस येणाऱ्या वाणांपैकी एक आहे. हे वान भारी काळ्या जमिनीसाठी विशेषतः योग्य आहे. दिवाळीच्या अगोदर कापसाची वेचणी पूर्ण होते, जे वेळेवर उत्पन्न मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते.
3. कोहिनूर सीड्स – महागुण
हे वान 155 ते 160 दिवसांमध्ये पूर्णपणे काढणीस येते. याच्या बोंडांचे वैशिष्ट्य म्हणजे ते मोठे व टपोरं असतात, त्यामुळे अधिक उत्पादनाची अपेक्षा करता येते. हे वान मध्यम आणि भारी जमिनीतही चांगली कामगिरी करते.
4. जे के सीड्स – पासपास
पासपास हे वान देखील लवकर काढणीस येणाऱ्या वाणांपैकी एक आहे. योग्य नियोजन आणि योग्य काळात लागवड केल्यास उत्तम उत्पादन मिळू शकते. हे वान विविध प्रकारच्या जमिनीत लावता येते.
निष्कर्ष
जर तुम्हाला लवकर काढणीस येणाऱ्या वाणांची लागवड करायची असेल, तर वरीलपैकी कोणत्याही वानाची निवड करू शकता. यामुळे दिवाळीच्या आधी कापूस वेचणी पूर्ण होऊ शकते, आणि बाजारात चांगले दर मिळवण्याची शक्यता वाढते.
तुम्हालाही जर असे कोणते वान माहिती असेल जे लवकरात लवकर काढणीस येते, तर कृपया खाली कॉमेंट करून नक्की सांगा.
ही माहिती आपल्या इतर गरजू शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी, कृपया हि माहिती शेअर करा.