
कापूस पिकासाठी तणनाशक – खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांपैकी एक म्हणजे कपाशी (कापूस). महाराष्ट्रात खूप मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली जाते. अनेक शेतकरी कपाशीचे योग्य व्यवस्थापन करतात – चांगल्या फवारण्या, उत्तम खतांचा वापर, पण तरीही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामागचं एक मोठं कारण म्हणजे तणांचं नियंत्रण न होणं.
कापसाच्या उत्पादनात तणांमुळे मोठं नुकसान
तणांमुळे कपाशीच्या उत्पादनात सुमारे 40% ते 50% नुकसान होतं. योग्य वेळेत तण नियंत्रण न झाल्यास कष्टाने घेतलेलं पीक देखील नुकसानात जातं. कपाशीची लागवड केल्यानंतर सुरुवातीचे 60 ते 70 दिवस तणमुक्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
कापूस पिकातील तण नियंत्रणासाठी सर्वोत्तम तणनाशक
तण नियंत्रणासाठी अनेक पर्याय आहेत, पण सगळ्यात सोपं आणि प्रभावी साधन म्हणजे तणनाशकाचा योग्य वापर. पण हे लक्षात ठेवा.
हिटवीड मॅक्स (hitwit max) हे एक सर्टिफाइड, प्रभावी तणनाशक आहे जे कपाशीतील रुंद आणि अरुंद प्रकारच्या तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम आहे.
हिटवीड मॅक्सचे (hitwit max tannashak) फायदे:
- रुंद व अरुंद तणांवर प्रभावी नियंत्रण
- मजुरीच्या खर्चाची बचत (प्रति एकर ₹900 ते ₹1200 पर्यंत बचत)
- कमी खर्चात जास्त उत्पादन
- पीक निरोगी व तणमुक्त
हिटवीड मॅक्सचा वापर कसा करावा?
- जेव्हा तणांची अवस्था 2 ते 4 पानांची असेल, तेव्हाच फवारणी करावी.
- प्रति एकर डोस:
- 450 मि.ली. हिटवीड मॅक्स
- 200 लिटर पाण्यात मिसळा.
- संपूर्ण एकरवर फवारणी करा.
खर्च वाचवा, उत्पादन वाढवा!
जर तुम्ही मजुरांद्वारे तण नियंत्रण करत असाल, तर एक एकरासाठी सुमारे ₹900-₹1200 खर्च येतो. पण हिटवीड मॅक्सचा वापर केल्यास तोच खर्च 50% पेक्षा जास्त वाचतो, आणि परिणामही अधिक चांगले मिळतात.
शेतकरी मित्रांनो, कापसाच्या शेतात तण नियंत्रण हाच उत्पादन वाढवण्याचा मुख्य मंत्र आहे. यासाठी हिटवीड मॅक्स हे प्रभावशाली तणनाशक वापरल्यास तुमचं शेत तणमुक्त राहील, आणि खर्चही कमी होईल.
📢 हा लेख जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.
आपलं कापूस पीक आरोग्यदायी, तणमुक्त आणि भरघोस उत्पादन देणारं होवो!
मी यावर्षी राशी 659 बियाण्याची लागवड केली