
नमस्कार मित्रांनो, रेशन धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! केंद्र शासनाच्या नवीन निर्णयानुसार आता रेशन कार्डधारकांना जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या तीन महिन्यांचं धान्य एकदाच मिळणार आहे.
यामागचं कारण काय?
भारतभर पावसाळा सुरू होत आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवतेय आणि हवामान प्रतिकूल होत चाललं आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने निर्णय घेतला आहे की रेशन दुकानांवर तांदूळ, गहू व अन्य धान्य 30 जून 2025 पर्यंतच वाटप करण्यात यावं, जेणेकरून लोकांना पुढील महिन्यांसाठी आधीच अन्नधान्य उपलब्ध होईल.
कोणते लाभार्थी पात्र आहेत?
हा निर्णय राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आहे, विशेषतः:
- अंत्योदय अन्न योजना (AAY)
- प्राधान्य कुटुंब (PHH) गटातील लाभार्थी
या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 पर्यंतचं अन्नधान्य 30 जूनपूर्वी मिळणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- 30 जून 2025 ही अंतिम तारीख आहे तीन महिन्यांचं धान्य घेण्यासाठी.
- धान्य वितरणासाठी क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- सुलभ वितरणासाठी आवश्यक उपाययोजना सुरू आहेत.
- वेळेत धान्य न घेतल्यास त्यानंतर धान्य मिळणार नाही.
आपण काय करावं?
आपण जर पात्र लाभार्थी असाल, तर त्वरित आपल्या नजीकच्या रास्तभाव दुकानावर जाऊन जून, जुलै व ऑगस्ट 2025 यासाठीचं धान्य घेऊन टाका.
शेवटी एक विनंती
ही महत्त्वाची माहिती आपल्या ओळखीच्या सर्व रेशन धारकांपर्यंत पोहोचवा. हा लेख शेअर करा, जेणेकरून कुणाचंही नुकसान होणार नाही, धन्यवाद.