अंतिम पैसेवारी 2025 जाहीर | 50 पैशांखालील जिल्हे, कर्जमाफी व पीक विमा मोठा दिलासा

जय शिवराय मित्रांनो!
खरीप हंगाम 2025 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अधिकृत आधार ठरणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम पैसेवारी 2025.

final paisevari 2025

अंतिम पैसेवारी ही केवळ आकडेवारी नसून, तीच कर्जमाफी, पीक विमा (Crop Insurance) आणि शासकीय सवलतींसाठी निर्णायक ठरणार आहे.

अंतिम पैसेवारी म्हणजे काय?

अंतिम पैसेवारी ही पीकपणी प्रयोगांवर आधारित असते. निवडक शेतांमध्ये प्रत्यक्ष पीक कापून उत्पादन किती घटले आहे हे निश्चित केले जाते.

हे पण वाचा:
20251231 1756418615588950643898638 Solar Subsidy Maharashtra 2025: छतावरील सोलर नवी योजना; लाभार्थ्यांना ₹45,000 Rooftop Solar Subsidy
  • कर्जमाफीसाठी मुख्य ट्रिगर
  • पीक विमा मिळण्याचा आधार
  • अतिवृष्टी नुकसान अधिकृतरित्या सिद्ध

50 पैशांखालील पैसेवारी का महत्त्वाची आहे?

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी येण्याचे संकेत आहेत. याचा अर्थ उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट झाली आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये पैसेवारी 50 पैशांखाली जाते, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी व पीक विम्याचा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 2025

जिल्ह्याची सरासरी पैसेवारी: 47.81 पैसे

हे पण वाचा:
20251230 1720568456855467528619800 लाडकी बहीण योजना KYC अपडेट 2025 | हफ्ते बंद होणार? दुबार KYC करावी का? अंतिम मुदत कोणती?
तालुकापैसेवारी
छ. संभाजीनगर46.70
पैठण46.11
फुलंब्री49.00
वैजापूर47.73
गंगापूर48.15

जालना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 2025

जालना जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आलेली आहे.

  • जालना – 151 गावे
  • भोकरदन – 156 गावे
  • अंबड – 138 गावे
  • मंठा – 117 गावे
  • घनसावंगी – 118 गावे
  • बदनापूर – 92 गावे
  • जाफ्राबाद – 101 गावे
  • परतूर – 98 गावे

शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार?

  • पीक विमा मंजुरी सोपी
  • कर्जमाफीसाठी मजबूत आधार
  • शासकीय मदतीसाठी पात्रता
  • अतिवृष्टी नुकसान अधिकृत मान्यता

पुढील अपडेट

उर्वरित जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी लवकरच जाहीर केली जाईल. ज्या जिल्ह्यांमध्ये पैसेवारी 50 पैशांखाली येईल, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो,धन्यवाद.

हे पण वाचा:
20251227 1719362405325522300628538 लाडकी बहीण योजना 31 डिसेंबर फिक्स तारीख || Ladki Bahin Yojana eKYC Update

Leave a Comment