
शेतकरी मित्रांनो, जर सध्याच्या काळात तुमचं कापूस पीक 45 ते 50 दिवसाचं झालं असेल, तर दुसरी फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याच काळात पातेधारणा सुरू होते आणि रसशोषक किडींचा प्रादुर्भावही दिसू लागतो.
किडींचा प्रादुर्भाव आणि लक्षणं
- हिरव्या रंगाचा तुडतुडा: पाने कोकडणे, कडांना पिवळसरपणा
- थ्रीप्स आणि मावा (Aphids): पाने वळणे, गडद ठिपके
रसशोषक किडींवर नियंत्रणासाठी कीटकनाशके
- UPL – अपाचे (16g प्रति 15L)
- Soll – ऑक्झेलीस (16g प्रति 15L)
- Endofil – सॅपर (25g प्रति 15L, डायनोटोफेरॉन + एसिफेट)
- BASF – इपिकॉन (28ml प्रति 15L)
बुरशीनाशकांची निवड (पातेगळ थांबवण्यासाठी)
- Adama – कस्टोडिया (20-25ml प्रति 15L)
- अवतार (40g प्रति 15L)
- UPL – साप (40g प्रति 15L)
पातेधारणा वाढवण्यासाठी टॉनिक
- टाटा – बहार (40ml प्रति 15L)
- ऑक्सिजन (50ml प्रति 15L)
- फनटॅक प्लस (25ml प्रति 15L)
- एम्बिशन (40ml प्रति 15L)
सिलिकॉन बेस स्टिकर (पावसाळ्यात फवारणी टिकवण्यासाठी)
पावसाळ्यातील फवारणी टिकवण्यासाठी एखादं सिलिकॉन बेस स्टिकर वापरा.
विद्राव्य खत (फुटवे सुधारण्यासाठी)
जर फुटवे कमी असतील, तर 12:61:0 खत 100g प्रति 15L पंप वापरा.
सूचना
- दुसऱ्या फवारणीत एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक वापरणं अनिवार्य आहे.
- पाच-सहा दिवसांनी फवारणीचा परिणाम पाहा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.