
नमस्कार शेतकरी मित्रांनो!
आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत – सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या टप्प्यात फवारणीची गरज व त्यासाठी योग्य औषधं कोणती?
चक्री भुंगा नियंत्रण – का आणि कसं?
सोयाबीन पिकाची लागवड झाल्यानंतर जवळपास 20-25 दिवस झाले की, पिकामध्ये चक्री भुंगा (Stem Fly) या किडीचा प्रादुर्भाव दिसतो, विशेषतः जर बीजप्रक्रिया नसेल केली तर.
चक्री भुंगा पिकाच्या खोडात अंडी घालतो आणि त्यामुळे पिक जळाल्यासारखं दिसतं.
✔️ फवारणीसाठी उपाय:
- लॅमडासायलुथ्रीन + थायमथॉक्झाम घटक असलेले कोणतेही कीटकनाशक वापरा
- उदाहरण: सिंजेंटा कंपनीचे ‘Alika’
- मात्रा: 10-15 मिली प्रति 15 लिटर पाणी
🌿 फुटव्यांची वाढ आणि फुलधारणेसाठी खत
जर तुम्हाला पिकात फुटव्यांची संख्या वाढवायची असेल आणि फुलधारणा चांगली हवी असेल, तर पुढील खत वापरा:
✔️ 12-61-00 विद्राव्य खत:
- स्फुरद प्रमाण: 61%
- मात्रा: 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी
- फायदे:
- शाकीय वाढ वाढवते
- फुलधारणा वाढवते
- मुळांची वाढ उत्तम करते
🍂 पान पिवळेपणा आणि मायक्रो न्यूट्रिएंट कमतरता
पानं पिवळी पडत असतील तर त्या वेळी मायक्रो न्यूट्रिएंट्स ची कमतरता असते.
मायक्रो न्यूट्रिएंट खताचा वापर:
- उदाहरण: RCF कंपनीचे ‘Microla’
- चिलेटेड किंवा लिक्विड स्वरूपातील खत वापरा
महत्त्वाचा सल्ला:
- महागडी औषधं न आणता कमी खर्चात प्रभावी उपाय करा
- फक्त फवारणीवर अवलंबून राहू नका
- योग्य नियोजन आणि खत व्यवस्थापन आवश्यक
चक्री भुंगा नियंत्रण, फुटव्यांची वाढ व फुलधारणेसाठी योग्य फवारणी करून आपण कमी खर्चात उत्तम उत्पादन घेऊ शकतो.
✅ हा लेख उपयुक्त वाटला तर तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही WhatsApp किंवा Facebook वर शेअर करा.