
पहिले खत व्यवस्थापन कधी करावे?
लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांदरम्यान पहिले खत व्यवस्थापन करणे सर्वात उपयुक्त मानले जाते. या टप्प्यावर झाडांची वाढ जोमात येण्यासाठी योग्य अन्नद्रव्यांची गरज असते.
पहिले खत व्यवस्थापन करतांना तुम्ही जास्तीत जास्त नत्रयुक्त खताचा वापर करू शकता.
कोणते खत वापरावे?
नत्रयुक्त खत (Nitrogen Based)
- 20-20-0-13 – दीड बॅग प्रति एकर
- किंवा D.A.P. (Diammonium Phosphate) – दीड ते दोन बॅग प्रति एकर
टीप : या खतांमध्ये नत्र व फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतो, पण पोटॅश (Potash) कमी असतो.
जर तुम्ही वरील खतांचा वापर करणार असाल तर सेपरेट 25 ते 30 किलो पोटॅश त्या खतांसोबत वापरणं गरजेचे आहे.
पोटॅश कसे द्यावे?
20-20-0-13 किंवा DAP च्या जोडीला 25-30 किलो पोटॅश स्वतंत्ररित्या द्या.
पर्यायी खत
15:15:15 खत – दोन बॅग प्रति एकरासाठी वापरू शकता.
मॅग्नेशियमचा वापर का गरजेचा आहे?
कापसाच्या पानांमध्ये जर लालसरपणा किंवा पिवळसरपणा दिसत असेल, तर ती मॅग्नेशियमची कमतरता असते.
उपाय – 10-15 किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर पहिल्या खत व्यवस्थापनात समाविष्ट करा.
सुरुवातीच्या टप्प्यात योग्य प्रमाणात नत्र, फॉस्फरस, पोटॅश आणि मॅग्नेशियम यांचे संतुलित खत व्यवस्थापन केल्यास झाडांची वाढ जोमदार होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते व उत्पादनात वाढ होते.
शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती इतर कापूस उत्पादक मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या गावातील WhatsApp ग्रुपमध्ये जरूर पाठवा.