राम राम शेतकरी मित्रांनो.

2025 चा खरीप हंगाम सुरू झालेला आहे, आणि त्यासोबतच शेतकरी बंधूंनी कापसाच्या योग्य बियाण्यांची निवड करण्याचा विचार सुरू केला आहे. आज आपण या लेखामध्ये टॉप ५ कापसाचे बियाणे कोणती आहेत आणि ती का निवडावीत, याबद्दल माहिती घेणार आहोत कारण शेतकरी मित्रांनो चांगल्या बियाण्याची निवड करणे अत्यंत गरजेचं असत.
1. मॅक्सकॉट – देहात (Dehaat Max Cot)
गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी पसंत केलेलं बियाणं म्हणजे मॅक्सकॉट. हे बियाणं अंदाजे 140 ते 145 दिवसात परिपक्व होतं.
याच्या बोंडाचे वजन सुमारे 6 ग्रॅम असतं आणि झाडांची उंची चांगली असल्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडींवरही चांगली सहनशक्ती असते.
बागायती शेतीसाठी हे उत्तम आहे, आणि प्रती एकर १ ते २ पॅकेट्स लागतात.
बोंड टपोरं आणि मोठं असल्यामुळे वेचणी सुद्धा सोपी होते.
हे बियाणं जवळच्या देहात केंद्रावर उपलब्ध आहे.
2. US 7067 – यूएस ऍग्री सिड्स (US Agriseeds 7067)
दुसऱ्या क्रमांकावर आहे US 7067 या नावाचं बियाणं. हे देखील जलद परिपक्व होणारं असून, बोंडं टपोरं आणि उत्पादन चांगलं देणारं आहे.
लवकरात लवकर आल्यामुळे जर तुम्हाला पुढच्या हंगामासाठी इतर पिकांची लागवड करायची असेल, तर हे बियाणं योग्य ठरू शकतं.
3. GHH 029 – बायो सिड्स (Bioseeds)
या व्हरायटीचं बोंड सुद्धा टपोरं आणि वजनदार आहे. मात्र, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे एक्स्ट्रा फवारणीचा खर्च येऊ शकतो, अनेक शेतकरी हे बियाणं निवडतात.
4. मोक्ष – आदित्य सिड्स (Aditya seeds Moksha)
मोक्ष ही व्हरायटी मध्यम आकाराच्या बोंडासाठी ओळखली जाते. उत्पादन समाधानकारक आहे आणि बाजारात सुद्धा त्याची मागणी आहे.
अगदी टपोरी नसली तरी स्थिर उत्पादन मिळवू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे एक चांगले पर्याय ठरते.
राशी 659 – राशी सिड्स (Rasi 659)
सर्वात शेवटी आणि सर्वाधिक पसंती मिळालेली व्हरायटी म्हणजे राशी 659.
या बियाण्याचे बोंड अतिशय टपोरं आणि जाड असते. एका बोंडाचे वजन सुमारे सरासरी 5 ग्रॅम पर्यंत जाते, या बियाण्याला अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिलेली आहे.
कृपया कमेंट करून सांगा – तुम्ही यावर्षी कोणत्या बियाण्याची निवड करणार आहात? आणि मागील वर्षी वापरलेल्या बियाण्याचा अनुभव काय होता?, तुम्हाला कसं उत्पादन भेटलेल आहे ? आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.