राज्य शासनाने 23 may 2025 रोजी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 2025-26 साठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाणार असून, त्यासाठी 400 कोटी रु. एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिलं जाणार आहे. या निर्णयाचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
✅ कोण पात्र आहे?
या योजनेच्या अनुदानासाठी पात्रतेचे काही ठळक निकष आहेत:
🎯 प्राधान्य गट:
- अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी
- महिला शेतकरी
- अल्प व अत्यल्प भूधारक
- शेतकरी गट आणि उत्पादक कंपन्या
💰 किती अनुदान मिळणार?
शेतकरी वर्ग | अनुदानाचे प्रमाण |
---|---|
अनुसूचित जाती-जमाती, महिला, अल्प/अत्यल्प भूधारक | ट्रॅक्टर किमतीच्या 50% किंवा ₹1.25 लाख, जे कमी असेल |
इतर सर्व शेतकरी | ट्रॅक्टर किमतीच्या 40% किंवा ₹1 लाख, जे कमी असेल |
📌 अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर करावा लागेल.
💡 लक्षात ठेवा:
- “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” तत्त्व लागू आहे.
- अर्जाची निवड, सोडत व अनुदान वितरण महाडीबीटी प्रणालीद्वारे होईल.
- ट्रॅक्टर खरेदीपूर्वी शासन संमती आवश्यक आहे.
🚫 अपात्रतेचे निकष
- मागील 5 वर्षांत जर शेतकऱ्याने महाडीबीटी योजनेतून ट्रॅक्टर किंवा कृषी यंत्र खरेदी केली असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- पूर्वसंमतीशिवाय ट्रॅक्टर खरेदी केल्यास, त्या प्रस्तावास मान्यता दिली जाणार नाही.
📅 योजना कधीपासून?
ही योजना 2025-26 वर्षासाठी राबवली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी apply करणे महत्त्वाचे आहे, धन्यवाद.