
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज ६ जुलै २०२५.
६ ,७ ,८ जुलै दरम्यान राज्यात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ ११ जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, भाग बदलत पडणार आहे.
या भागात पाऊस
नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,यवतमाळ,नांदेड,हिंगोली,वाशीम,परभणी,बुलढाणा,अकोट,अकोला,जालना,जळगाव,जळगाव जामोद,धुळे,नंदूरबार या भागांमध्ये ६ ,७ ,८,९ जुलै दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे, सर्वोदोर नसणार पडणार नाही, मोठा पाऊस जास्त असणार नाही.
फक्त पूर्व विदर्भात 6,7,8 july 2025 दरम्यान ६ जिल्ह्यात चांगला पाऊस असणार आहे.
मराठवाड्यात नांदेड,परभणी,हिंगोली,जालना,लातूर,बीड,धाराशिव या जिल्ह्यामध्ये खूप जास्त सर्वोदोर पडणार नाही,भाग बदलत पाऊस पडणार आहे.
परभणी जिल्ह्यात ७० % भागामध्ये चांगला पाऊस असणार आहे, म्हणून परभणी जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी.
लातूर,धाराशिव,सोलापूर या भागामध्ये जास्त नाही,कमी प्रमाण असणार.
कोकणपट्टी आणि घाटमाथ्यावर सर्वोदोर सारखा पाऊस असणार, तो पाऊस कमी होणार नाही.
नाशिक,धुळे,नंदुरबार सारिओसरी चालूच राहणार.
आहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेरच्या पलीकडील भागात सारिओसरी ८ तारखेपर्यंत असणार.
या भागात सगळ्यात जास्त पाऊस
सगळ्यात जास्त पाऊस नागपूर,गडचिरोली,चंद्रपूर,वर्धा,भंडारा,यवतमाळ,अमरावती,वाशीम,पुसद,बुलढाणा हा पट्टा ईशान्य च्या भागाकडे जास्त पाऊस असणार आहे, मध्यप्रदेशमध्ये जास्त पडत असल्यामुळे तिकडं पाऊस जास्त असणार आहे.
राज्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस
वारे 7 तारखेला बंद झाल्यानंतर 13 जुलै ते 27 जुलै दरम्यान राज्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस येईल, तो सर्वोदोर असणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यावे, धन्यवाद.