अखेर पीकविमा 2025 योजनेचा GR आला – संपूर्ण माहिती

pikvima-yojana-2025-gr-maharashtra-25625

अखेर खरीप हंगाम 2025 आणि रबी हंगाम 2025-26 साठी राज्य शासनाने पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील एक महत्त्वाचा असा शासन निर्णय (जीआर) 24 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला असून, या अंतर्गत राज्यात कप अँड कॅप मॉडेल 80110 नुसार योजना राबवली जाणार आहे.

या जीआरमध्ये एकूण 499 पानांद्वारे पीक विमा योजनेची संपूर्ण कार्यपद्धती स्पष्ट करण्यात आलेली आहे – जसे की उद्दिष्ट, सहभागी कंपन्या, कालावधी, नियमावली, क्रॉप कॅलेंडर, जोखीम धोरणे आणि नुकसान भरपाईचे निकष. नैसर्गिक आपत्ती, कीड रोग यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

ही योजना पूर्णपणे ऐच्छिक असून, नोंदणीकृत भाडेपट्टीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही यामध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी त्यांना नोंदणीकृत भाडे करार अपलोड करावा लागणार आहे.

हे पण वाचा:
20250824 1210186812619970215000154 भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू | Bandhkam Bhandi Vatap Yojana 2025

विमा हप्ता दर खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत:

  • खरीप हंगामासाठी : 2%
  • रबी हंगामासाठी : 1.5%
  • नगदी पिकांसाठी : 5%

योजना 12 जिल्हा समूहांमध्ये निवडलेल्या पीक विमा कंपन्यांद्वारे राबवली जाईल. विमा कंपन्यांना जमा हप्त्याच्या 110% किंवा विमा संरक्षित रकमेच्या 110% पैकी जे जास्त असेल तेवढे दायित्व स्वीकारावे लागेल.

एकूण जमा हफ्ता रकमेपेक्षा जर नुकसान भरपाई कमी झाली, तर कंपनीला जास्तीत जास्त 20% रक्कम स्वतःकडे ठेवण्याची परवानगी आहे, उर्वरित रक्कम राज्य शासनाला परत करावी लागणार आहे.

हे पण वाचा:
20250823 123105965675475646624786 पीएम किसान व नमो शेतकरी थकीत हप्ते येणार? 18,000+12,000 रुपये क्रेडिट अपडेट 2025
  • या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावाने विमा भरणे किंवा अवैध मार्गाने विमा मिळवण्याचे प्रकरण आढळल्यास अर्ज रद्द करण्यात येणार आहेत.
  • अर्ज करताना शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) आवश्यक आहे आणि
  • नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीक पाहणी अनिवार्य असणार आहे.

योजनेत समाविष्ट असलेली पिके:

  • खरीप हंगामासाठी: भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस, कांदा.
  • रबी हंगामासाठी: गहू, बागायती रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, भुईमूग , रबी कांदा.

योजना कोणत्या जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे ?

अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली.

  • धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांसाठी: आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनीमार्फत योजना राबवली जाईल.

महत्वाच्या तारखा

  • खरीप पीक विमा भरायची तारीख: 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025
  • रबीसाठी: पिकानुसार भिन्न तारखा असतील.
  • पीक पाहणी, पीक बदल, नुकसान भरपाई प्रक्रिया यासाठीचे कालावधी व सूचना जीआरमध्ये दिल्या आहेत.

499 पानांचा हा शासन निर्णय, maharashtra.gov.in वर पाहायला मिळू शकतो. तुम्हाला कोणत्या मुद्द्याबद्दल माहिती हवी आहे, ते कमेंटमध्ये जरूर कळवा.

हे पण वाचा:
20250821 1330353530381352334124443 किसान क्रेडिट कार्ड मोहीम 2025: शेतकऱ्यांसाठी Online Loan Apply | फक्त 1 रुपयात पीक कर्ज

धन्यवाद.

Leave a Comment