
राज्यात खरीप हंगाम 2025 पासून नव्या सुधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एक रुपयात मिळणारी जुनी योजना बंद होऊन आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेती क्षेत्राच्या प्रमाणात ठराविक हप्ता भरावा लागणार आहे.
उंबरठा उत्पादन आणि सरासरी उत्पादकता म्हणजे काय?
उंबरठा उत्पादन:
- मागील 7 वर्षांत एखाद्या पिकाचे उत्पादन किती झाले, त्यातील सर्वाधिक उत्पादन असलेल्या 5 वर्षांचा विचार.
- त्या 5 वर्षांचे सरासरी उत्पादन म्हणजे उंबरठा उत्पादन.
सरासरी उत्पादकता:
- दरवर्षी सरकारद्वारे जिल्हानिहाय जाहीर केली जाते.
- पीक कापणी प्रयोगांवर आधारित असते.
- हमीभावाच्या खरेदीवेळी जाहीर केली जाणारी उत्पादकता हीच विमा निकषासाठी वापरली जाते.
नुकसान भरपाई कशी ठरते?
उदाहरण:
जर उंबरठा उत्पादन = 10 क्विंटल
आणि सरासरी उत्पादकता = 12 क्विंटल
तर = 10 – 12 = -2 क्विंटल
याचा अर्थ नुकसान भरपाई मिळणार नाही.
असे उदाहरण अनेक जिल्ह्यांमध्ये दिसून आले आहे – सरकारद्वारे जाहीर सरासरी उत्पादकता जास्त, पण उंबरठा उत्पादन कमी.
कप अँड कॅप मॉडेल कायम, पण ट्रिगर निकष रद्द
मागीलप्रमाणेच कप अँड कॅप मॉडेल ठेवण्यात आले आहे, परंतु “ट्रिगर निकष” रद्द करण्यात आले असून नुकसान भरपाई केवळ पीक कापणीच्या अंतिम अहवालावर आधारित असणार आहे.
क्रॉप सर्वेक्षण आणि मोबाइल अॅप वापर
2025 पासून पीक कापणीचे सर्वेक्षण क्रॉप सर्वे Application द्वारे होणार आहे. संपूर्ण डाटा केंद्र शासनाकडे पाठवला जाणार असून, त्यासाठी सहाय्यकांना ₹1000 मानधनही निश्चित केले आहे.
विमा मिळत नाही यामागचं खऱ्या कारण
गेल्या काही वर्षांत लाखो शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच नाही. कारण:
- सरासरी उत्पादकता आणि उंबरठा उत्पादनातील विसंगती
- पीक कापणीचा अहवाल वाचायला अपारदर्शक प्रक्रिया
शेतकऱ्यांची मागणी
“2025 चा पीक विमा योजना जर याच निकषांवर आधारित असेल, तर हा शेतकऱ्यांवर अन्याय ठरणार.”
शेतकऱ्यांची मागणी:
- ट्रिगर निकष परत लागू करावेत
- उंबरठा उत्पादनाचे मोजमाप पारदर्शक करावे
- सरासरी उत्पादकतेचा आधार वस्तुनिष्ठ करावा
2025 मधील नवी पीक विमा योजना सरकारच्या दृष्टीने सुधारित असली, तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने गोंधळ आणि अन्यायाचे साधन ठरण्याची शक्यता आहे. यामुळे धोरणात बदल होणे अत्यंत आवश्यक आहे, धन्यवाद.