
शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, तर एक महत्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. फक्त पीक विम्याचा फॉर्म भरल्याने आपोआप विमा मिळत नाही. गेल्या काही वर्षांपासून हजारो शेतकरी याच गैरसमजुतीत नुकसान सोसत आहेत.
पीक विमा योजना का थांबतो?
- बर्याच शेतकऱ्यांनी विमा फॉर्म भरला असला तरी त्यांनी क्लेम नोंदवला नाही.
- जे शेतकरी क्लेम करतात त्यांनाच कन्फर्म पीक विमा मिळतो.
- नुकसान झाले तरी क्लेम नोंदवला नाही, तर विमा कंपनीला माहिती मिळत नाही आणि भरपाई थांबते.
क्लेम कसा करावा?
- Crop Insurance App च्या माध्यमातून तक्रार नोंदवा.
- पीक विम्याच्या पावतीवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती द्या.
- तक्रार नोंदवल्यानंतर विमा कंपनीचे कर्मचारी तुमच्या शेतात येऊन:
- पिकांचे फोटो काढतील
- नुकसानाची नोंद करतील
यानंतर नुकसानाच्या प्रमाणावर भरपाई निश्चित केली जाईल.
महत्वाची अट
- नुकसान झाल्यानंतर 24 तासांच्या आत क्लेम नोंदवणे आवश्यक आहे.
- अन्यथा विमा कंपनीकडे नुकसानाची नोंद होणार नाही.
उदाहरण
सध्या अनेक भागांमध्ये पावसामुळे मुगाच्या शेतात मोड येत आहे. जर तुम्ही मूग पीक विमा भरला असेल, तर त्वरित तक्रार नोंदवा. अन्यथा पुढे नुकसानाची भरपाई मिळणे अशक्य होईल.
👉 नुकसान झाल्यास त्वरित क्लेम नोंदवा.
👉 क्लेम नोंदवल्याशिवाय विमा मिळणार नाही, हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी संदेश
जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा.
क्लेम नोंदवूनच विम्याचा खरा लाभ मिळवता येईल, धन्यवाद.