
पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,कोकणपट्टी,खान्देश,पश्चिम महाराष्ट्र,दक्षिण महाराष्ट्र सगळीकडे २१ ऑगस्ट २०२५ पासून पावसाचा जोर ओसरणार आहे.
राज्यामध्ये २१,२२ ,२३, २४ ऑगस्ट दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.
२१ तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे.
त्यांनतर २६ ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होणार आहे.
सर्व शेतकऱ्यांनी २१ तारखेला पाऊस उघडल्यानंतर २५ तारखेपर्यंत शेतीची कामे करून घ्या, सोयाबीनच्या शेतात पाणी साचले असेल तर, सुपर फॉस्फेट फेका, त्याने तुमचे शेत लवकर हाडकुन जाईल, फवारणी करून घ्या व खते देखील टाकून घ्या.
26,27,28 नंतर परतएकदा पावसाला सुरुवात होणार आहे, परंतु तो पाऊस जास्त मोठा नसणार, अतिवृष्टी सारखा नसणार.
पण 26,27,28 नंतर येणार पाऊस नागपूर,वर्धा,अमरावती,यवतमाळ,वाशीम,अकोला,नांदेड,परभणी,बुलढाणा,अकोला,जालना,छत्रपती संभाजीनगर,जळगाव,आहिल्यानगर,पुणे,नाशिक,मुंबई,नंदुरबार,जळगाव,धुळे,बीड या पट्ट्यामध्ये 26,27 तारखेचा पाऊस राहणार आहे.
28,29 ऑगस्ट नंतर पाऊस विखुरलेल्या स्वरूपाचा राहील, म्हणून हे लक्षात घ्यावे,धन्यवाद.