
आज आहे २ जून २०२५.
आजचा हवामान अंदाज
2,3,4,5 जूनच्या दरम्यान दररोज राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या 10-20 मिनिटाच्या सरी येणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं.
राज्यात पाऊस एकदम बंद होणार नाही, पावसाचा खंड पडलेला नाही, आज धाराशिव,सोलापूर या जिल्ह्यात आज बऱ्याच ठिकाणी तुरळक 10-15 मिनिटाच्या सारी येत राहणार आहे, 3,4 तारखेला विदर्भात बुलढाणा,अकोला,अमरावती,जळगाव तिकडे देखील थोड्या 10-15 मिनिटाच्या सरी येणार आहे, फक्त दहा पंधरा मिनिटाचा पाऊस पडणार आहे.
पुन्हा पाऊस येणार – पंजाब डख
सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो ६ जूनपर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या, कारण कि राज्यामध्ये ७ जून,८ जून,९ जून,१ ० जूनच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे.
त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जर ७ ते १ ० जूनपर्यंत नाही झालं तर तुम्ही १ २ जूनपर्यंत तुम्ही शेताची कामे करून घ्या, कारण कि राज्यामध्ये १ ३ जून ते १८ जून २०२५ राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी वडे नाले वाहतील असा पाऊस असणार आहे.
१३ ते १८ जून मुसळधार
१ ३ जून पासून ते १ ८ जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोरात पाऊस पडणार आहे, मुंबई,पुणे,नाशिक,संगमनेर अति मुसळधार पाऊस असणार आहे, नगर जिल्ह्यात देखील अति मुसळधार पाऊस असणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात पाऊस ?
१३ जून ते १७ जून च्या दरम्यान लातूर जिल्हा,नांदेड,बीड,धाराशिव,सोलापूर,सातारा,सांगली,कोल्हापूर, नगर जिल्हा,छत्रपती संभाजीनगर,जालना,उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार,जळगाव,पारगोळा,बुलढाणा,अकोला,अमरावती,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,यवतमाळ,हिंगोली,वाशीम सांगायचं झालं तर सर्वच जिल्ह्यात 13 ते 18 जूनपर्यंत खूप पाऊस पडणार आहे.
यंदा जूनच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार आहे, त्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणीही वंचित राहणार नाही.
७ ,८ जूनला देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर १३ जून ते १७ जून देखील खूप पाऊस पडणार आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीचा,लागवडीचा निर्णय स्वतः घ्यावा, धन्यवाद.