
राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थींना आनंदाची बातमी दिली आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत.
पात्र महिला कोण?
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी
- ज्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी
योजना कधीपासून राबवली जात आहे?
ही योजना जुलै 2024 पासून सुरू झाली असून जुलै 2025 ला एका वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. याअंतर्गत मागील आर्थिक वर्षात महिलांना तीन गॅससाठी सबसिडी देण्यात आली होती.
नवीन अनुदान कधी मिळणार?
2025-26 या आर्थिक वर्षासाठी ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये महिलांच्या खात्यात DBT द्वारे अनुदान जमा केले जाणार आहे.
निधी वितरणाची माहिती
- 10 जुलै 2025 रोजी आदिवासी विकास विभागाचा निधी वितरित
- 25 कोटींपैकी 15 कोटी रुपये अनुदान वितरणासाठी वापरले
- अनुसूचित जमातीच्या महिलांना DBT द्वारे रक्कम जमा होणार
किती गॅस सिलेंडर मिळणार?
लाभार्थींना प्रत्येक आर्थिक वर्षात 3 मोफत गॅस सिलेंडर मिळतील. एका महिन्यात जास्तीत जास्त एक सिलेंडर मिळण्याची अट आहे.
पुढील टप्प्यात काय?
अन्य विभागांचे (सर्वसाधारण, अनुसूचित जाती इ.) निधी लवकरच वितरित केले जातील. ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये हे सर्व अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल.
धन्यवाद!