
शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात यावर्षी मक्याची लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र यासोबतच गवताचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. गवतामुळे मका उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. म्हणून योग्य तणनाशकाचा वापर हा अत्यावश्यक आहे.
प्रभावी तणनाशके आणि त्यांचा वापर
1️⃣ टिंजर (BASF Tynzer) – घटक : Topramezone 33.6%
डोस: ३० मिली प्रति एकर
फवारणी पद्धत: १० लिटर पाण्यात ३० मिली टिंजर मिसळा, प्रत्येक १५ लिटरच्या पंपासाठी १ लिटर वापरा.
टीप: ट्रॉपझोन असलेलं कोणतंही तणनाशक चालेल.
2️⃣ कॅलरीज एक्स्ट्रा (Calaris xtra) – कंपनी: Syngenta
डोस: १४० मिली प्रति एकर
फवारणी पद्धत: ९ लिटर पाण्यात १४० मिली मिसळा, १० टाक्यांसाठी फवारणी करा.
लव्हाळा साठी तणनाशक
सॅमप्रा (Dhanuka Sempera) – घटक: हॅलोफन मिथाईल (Halosulfuron-methyl)
डोस: ३.६ ग्रॅम प्रति १५ लिटर पंप
वापर: टिंजर/कॅलरीज एक्स्ट्रासोबत मिसळून लवळीच्या ठिकाणी फवारणी करा.
तणनाशक फवारणीचे महत्वाचे नियम
- पाण्याचा pH: 6.5 ते 7 दरम्यान असावा. pH बॅलन्सर वापरावा.
- गवताची अवस्था: 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असलेले गवतच योग्यरित्या जळते.
- उच्च वाढलेलं गवत: यावर तणनाशकाचा परिणाम कमी होतो.
तणनाशकाचा योग्य वापर केल्यास मका पिकातील उत्पादनात वाढ होऊ शकते. वरीलपैकी कोणतेही घटक असलेले तणनाशक घ्या आणि सुचवलेली मात्रा वापरा. पाण्याचा दर्जा व गवताची अवस्था तपासूनच फवारणी करा
ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा.