महाराष्ट्रात 462 नवीन राशन दुकानांसाठी अर्ज सुरु – गावानुसार यादी व अंतिम तारीख पहा!

maharashtra-ration-dukan-arj-apply-2025

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या स्वस्थ धान्य दुकानांसाठी (राशन दुकान) नवीन परवाने देण्यासाठी अर्ज मागवले गेले आहेत. जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून या रिक्त जागांवर नवीन दुकानांसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.


📍 सातारा जिल्ह्यात एकूण 141 रिक्त जागा

तालुक्यानुसार रिक्त गावे:

  • सातारा – 8 गावे
  • वाई – 15 गावे
  • कराड – 6 गावे
  • महाबळेश्वर – 44 गावे
  • कोरेगाव – 13 गावे
  • खटाव – 2 गावे
  • फलटण – 4 गावे
  • पाटण – 19 गावे
  • माण – 4 गावे
  • खंडाळा – 7 गावे
  • जावळी – 8 गावे

🗓 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जुलै 2025


📍 यवतमाळ जिल्ह्यात एकूण 321 रिक्त जागा

तालुक्यानुसार रिक्त गावे:

  • महागाव – 2
  • पुसद – 31
  • वणी – 55
  • घाटंजी – 20
  • केळापूर – 30
  • झरी-जामनी – 10
  • बाभूलगाव – 21
  • उमरखेड – 12
  • दारव्हा – 4
  • राळेगाव – 43
  • यवतमाळ – 19
  • कळंब – 25
  • आर्णी – 9
  • दिग्रस – 6
  • मारेगाव – 24
  • नेर – 8

🗓 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 जुलै 2025

हे पण वाचा:
20250824 1210186812619970215000154 भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू | Bandhkam Bhandi Vatap Yojana 2025

📌 कोण अर्ज करू शकतो?

✅ ग्रामपंचायत
✅ तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था
✅ नोंदणीकृत स्वसहायता बचत गट
✅ नोंदणीकृत सहकारी संस्था
✅ महिलांचे बचत गट / सहकारी संस्था


🧾 अर्ज कसा कराल?

  • अर्ज नमुना: संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध
  • फीस: ₹100 (चलनाद्वारे भरणे आवश्यक)
  • अर्जासोबत संस्थेची नोंदणी कागदपत्रे अनिवार्य
  • प्राधान्य क्रमानुसार निवड प्रक्रिया

जर आपला बचत गट, सहकारी संस्था किंवा ग्रामपंचायत या गावांपैकी कुठल्याही गावातून असेल तर ही सुवर्णसंधी गमावू नका!

हे पण वाचा:
20250823 123105965675475646624786 पीएम किसान व नमो शेतकरी थकीत हप्ते येणार? 18,000+12,000 रुपये क्रेडिट अपडेट 2025

Leave a Comment