
नमस्कार लाडक्या बहिणींनो,
आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत जून 2025 महिन्याचा हप्ता आता मंजूर झाला आहे. सरकारकडून त्यासंबंधीचा अधिकृत शासन निर्णय (GR) 30 जून 2025 रोजी जाहीर करण्यात आला असून, या निर्णयानुसार निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
खात्यात दोन ते तीन दिवसांत पैसे
या निर्णयानुसार, दोन ते तीन दिवसांच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये योजना अन्वये मिळणारी रक्कम जमा होणार आहे. बहुतांश लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच ते सहा दिवसांत पैसे जमा होतील.
योजनेची प्रमुख माहिती:
- ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे.
- महिलांनी 65 वर्ष पूर्ण केल्यास, त्यांचे हप्ते आपोआप बंद होतील.
- सध्या महिलांना प्रत्येक महिन्याला ठराविक निधी पंधराशे रुपये मिळतो.
- या योजनेत अद्याप कोणतेही नवीन बदल झालेले नाहीत.
जीआरमध्ये नमूद महत्त्वाचे मुद्दे:
शासन निर्णयामध्ये म्हटले आहे की,
- या योजनेच्या अंतर्गत 28,290 कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार वितरित करण्यात येत आहे.
- हा निधी विविध जिल्ह्यांमधील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केला जाणार आहे.
- GR आल्यानंतर 2–3 दिवसांत पैसे जमा होण्यास सुरुवात होते.
पैसे कधी पडतील?
हा प्रश्न अनेक बहिणी सतत विचारत असतात – “आज पडतील का? उद्या की परवा?” तर उत्तर अगदी सोपे आहे:
शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर 2–3 दिवसांत पैसे जमा होतात आणि सर्वांच्या खात्यात पैसे पोहोचण्याची प्रक्रिया 5–6 दिवसांत पूर्ण होते.
हा महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या सर्व बहिणींना लवकरात लवकर कळावा म्हणून, कृपया हा ब्लॉग पोस्ट शेअर करा.
धन्यवाद! जय हिंद, जय महाराष्ट्र!