कापूस पिकावर पहिली फवारणी कधी आणि कोणती घ्यावी? संपूर्ण मार्गदर्शक

kapus-pik-pahili-favarani-for-farmers-24625

राम राम शेतकरी बांधवांनो! आज आपण पाहणार आहोत की कापसावर पहिली फवारणी कधी, कशी, आणि कोणती करावी.


कापूस लागवडीनंतरचा पहिला टप्पा

जर आपल्या कापसाची लागवड 20-25 मे च्या दरम्यान झाली असेल, तर आज कापूस पीक 25 ते 30 दिवसांचं झालेलं असेल. पहिली फवारणी साधारणतः 30-35 दिवसांदरम्यान घ्यावी.


माव्याचा प्रादुर्भाव – नियंत्रणाचे उपाय

सुरुवातीच्या काळात हिरव्या व काळ्या माव्याचा प्रादुर्भाव दिसतो. पानं चीकट व तेलकट होतात.

हे पण वाचा:
20250822 173010396012266035088147 पोळा अमावस्या कापूस फवारणी कोणती करावी ?

👉 उपाय:

  • जास्त मावा असेल:
    फ्लोनिकॅमिड 50% घटक असलेलं उलाला (Ulala) –
    8 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप
  • नॉर्मल मावा असेल:
    थायमथॉक्सम 25% असलेलं एक्ट्रा (Actara) –
    10-12 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप

🍁 पाने लालसर, पिवळसर झाल्यास काय कराल?

कापसाचे खोड व पाने लालसर/पिवळसर दिसत असल्यास ती नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम अन्नद्रव्यांची कमतरता असते.

👉 उपाय:

  • 19:19:19 विद्राव्य खत
    100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप
    (कीटकनाशकाबरोबर वापरू शकता)

💪 पीक वाढीसाठी पोषक टॉनिक

फवारणीचा खर्च कमी ठेवणे आवश्यक आहे. पण चांगल्या उत्पादनासाठी पोषक टॉनिकसुद्धा महत्त्वाचे आहेत.

टॉप टॉनिक पर्याय:

  1. बायोविटा एक्स (Biovita x) – 40 ml प्रति 15 लिटर
  2. ऑक्सिजन (Oxygen) – 50 ml प्रति 15 लिटर
  3. अम्बिशन (Ambition) – 40 ml प्रति 15 लिटर

आपल्याकडे चांगल्या अनुभवाचं टॉनिक असेल, तर ते वापरण्यातही काही हरकत नाही.

हे पण वाचा:
20250820 1437502664305096182408986 कापूस पिकाची वाढ थांबली काय करावे? कापूस वाढीसाठी फवारणी: झटपट रिझल्ट

निष्कर्ष: फवारणी योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणात करा

  • माव्याचे नियंत्रण
  • अन्नद्रव्य कमतरतेचा उपचार
  • पोषणासाठी टॉनिकचा समावेश

ही सर्व फवारणी एकाच वेळी 15 लिटरच्या फवारणी पंपात करता येईल, धन्यवाद.

Leave a Comment