कापसाच्या पानांना पिवळसर रंग का येतो? उपाय : लगेच हिरवेगार होणार

kapus-pane-pivli-zali-karan-upay-2025

कापसाच्या पानांना पिवळसर व खोडांना लालसर रंग का येतो?

शेतकरी बांधवांनो, अनेकदा तुम्हाला दिसून येतं की कापसाचं पीक वाढत असताना पानं पिवळी पडतात व खोड लालसर दिसू लागतं. यामागे मुख्य कारण म्हणजे अन्नद्रव्यांची (nutrients) कमतरता किंवा जर पाणी कमी असेल तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो.

विशेषतः काळीट जमिनीत किंवा जिथे पाणी साचतं तिथं ही समस्या जास्त दिसते.


📉 अन्नद्रव्यांची कमतरता का होते?

  1. खतांचा उशिरा वापर:
    • जर 25-30 दिवसाच्या आसपास पहिले खत व्यवस्थापन केले असेल तर, हा प्रॉब्लेम येऊ शकतो.
    • नायट्रोजन 4-5 दिवसात लागू होतं,
      फॉस्फरस – 15-16 दिवसात,
      पोटॅशियम – 30-35 दिवसात.
  2. मागील पिकांचा प्रभाव:
    ऊस किंवा मका सारखी पिकं घेतल्यानंतर मातीतील मूलभूत अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते.
  3. पाण्याचा अयोग्य निचरा:
    • सतत पाणी साचल्यामुळे मूळ व्यवस्थापन बिघडतं आणि पोषण शोषणात अडथळा येतो.

✅ उपाय योजना

1. फवारणीसाठी सोल्युशन:

  • 19:19:19 विद्राव्य खत (Water Soluble Fertilizer)
    ➤ 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.

2. ड्रीपद्वारे खत व्यवस्थापन:

  • जर ड्रीप सिंचन आहे तर
    ➤ प्रति एकर 4-5 किलो 19:19:19 खत 200 लिटर पाण्यात मिसळा.

जर हि उपाययोजना केली नाही तरी तुम्ही दाणेदार स्वरूपातील खते टाकणार आहात, त्याने सुद्धा तुमचा कापूस पीक आपोआप 10-15 दिवसात हिरवागार होईल.

हे पण वाचा:
20250624 2040308899135631856912615 कापूस पिकावर पहिली फवारणी कधी आणि कोणती घ्यावी? संपूर्ण मार्गदर्शक

म्हणून या प्रोब्लेमला घाबरून जाऊ नका, यामुळे तुमच्या कापूस पिकाला जास्त नुकसान होणार नाही.


3. भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाय:

  • पीक लागवडीच्या आधीच खत टाका.
    उदा: 10:26:26 किंवा डीएपी, पोटॅश

👉 हि माहिती उपयुक्त वाटल्यास इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, धन्यवाद.

हे पण वाचा:
20250621 1657164708351095445483748 कापूस पिकासाठी पहिले खत व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती (2025)

1 thought on “Kapus Biyane: 2025 साठी टॉप 5 कापूस बियाणे ! रेकॉर्डब्रेक उत्पादन”

  1. मी यावर्षी राशी 659 बियाण्याची लागवड केली

    Reply

Leave a Comment