Free Tablet Yojana 2025: 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फ्री टॅबलेट योजना : महाराष्ट्र सरकारकडून मोठी घोषणा!

Free Tablet Yojana 2025: या वर्षी दहावी पास झालेल्या मुलांसाठी राज्य सरकारच्या महाज्योति संस्थेमार्फत एक महत्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि त्यासोबत दररोज 6GB इंटरनेटसह सिम कार्ड दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो.

free-tablet-yojana-2025-maharashtra

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख

या योजनेत दोन मोठे बदल झाले आहेत. पहिला बदल म्हणजे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आलेली आहे. पूर्वी Form भरण्याची शेवटची तारीख 31 May 2025 होती. मात्र, अजूनही 11वीचे प्रवेश पूर्णपणे सुरू झालेले नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांकडे प्रवेशाची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट नव्हते.त्यामुळे आता ही तारीख पुढे ढकलून 20/06/2025 करण्यात आलेली आहे. आणि यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मुदतवाढ होण्याची शक्यता आहे.


फ्री टॅबलेट योजना पात्रता

दुसरा मोठा बदल म्हणजे मेरिटसाठी आवश्यक टक्केवारी.तुम्ही जर ग्रामीण भागातील विद्यार्थी असाल तर तुमचे 60% पेक्षा अधिक मार्क असणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही शहरी भागातून असाल तर तुमचे 70% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहेत, तरच तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येईल.

हे पण वाचा:
20250824 1210186812619970215000154 भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू | Bandhkam Bhandi Vatap Yojana 2025

जर तुमची Form भरताना चूक झाली असेल, तर तुम्ही तो Form एडिट करू शकता. फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच आहे – तीच प्रोसेस फॉलो करून, हवी ती माहिती दुरुस्त करून परत एकदा फॉर्म सबमिट करता येतो. व लक्षात ठेवा, या प्रक्रियेसाठी कोणतीही फी आकारली जात नाही.

Free Tablet कधी मिळणार ?

टॅबलेट लगेच मिळणार नाही. Form Submit केल्याच्या नंतर 4 – 5 महिने लागतात. तुम्हाला फोनद्वारे संपर्क केला जाईल आणि जिल्हास्तरीय ठिकाणी बोलावलं जाईल. त्या जागेवर तुम्हाला 2–3 प्रिंटआउट्स घेऊन जावे लागेल तिथे तुम्हाला Free Tablet दिलं जाईल.

या योजनेचे ओरिजनल नाव ‘JEE/NEET/MHT-CET 2025-27 परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना’ असं आहे. आपण सर्वसामान्यपणे हिला “फ्री टॅबलेट योजना” असं म्हणतो. या योजनेत टॅबलेटसोबत मोफत सिम कार्ड आणि दररोज 6 GB इंटरनेट सुविधा दोन वर्षांपर्यंत दिली जाते.

हे पण वाचा:
20250823 123105965675475646624786 पीएम किसान व नमो शेतकरी थकीत हप्ते येणार? 18,000+12,000 रुपये क्रेडिट अपडेट 2025

2025 मध्ये जर तुमच्या नातेवाईकांमध्ये,मित्रांमध्ये किंवा घरात कोणी दहावी उत्तीर्ण झालं असेल, तर कृपया त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. हा ब्लॉग शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल. काही अडचण असल्यास कमेंट करा किंवा संपर्क साधा. आणि अजून फॉर्म भरला नसेल, तरी काळजी करू नका – मुदतवाढ झालेली आहे. आरामात फॉर्म भरा, धन्यवाद.

Leave a Comment