
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे ८ जानेवारी २०२६.
८,९ आणि १० जानेवारी २०२६ दरम्यान राज्यात उत्तरेकडून वारे सुटल्यानंतर थंडी जाणवणार.
राज्यामध्ये ११,१२,१३ जानेवारी २०२६ दरम्यान परत राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे, तुरळक ठकाणी थेंब देखील पडणार.
सगळीकडे पाऊस पडणार नाही, परंतु सगळीकडे आभाळ खूप येणार.
११ तारखेला सोलापूर,लातूर,नांदेड,चंद्रपूर,सांगली,सातारा,जत या पट्ट्यामध्ये खूप आभाळ येणार, म्ह्णून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.
8,9,10 जानेवारी 2026 पर्यंत राज्यात रात्रीच्याला थंडी जाणवणार आहे, हे लक्षात घ्यायचं.
राज्यामध्ये 12 जानेवारी ते 14 जानेवारी 2026 दरम्यान खूप ढगाळ वातावरण होणार आहे, वातावरणात मोठा बदल होणार आहे.
वातावरणात बदल का होणार ?
तेलंगणा,आंध्रप्रदेश तिकडे जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे,परंतु तामिळनाडू राज्यात आणि केरळ राज्यात १ कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळे, तिरुपती बालाजी कडे देखील 12,13,14 जानेवारी दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस तामिळनाडू राज्यात पडणार आहे,केरळ राज्यात देखील पडणार आहे.
तिकडे पाऊस पडत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात वातावरणात बदल होणार आहे.
महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील,तुरळक ठिकाणी थेंब पडतील.
अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.