
महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पाऊस, 21 ऑगस्टपासून ऊन पडणार
शेतकरी मित्रांनो, पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल होणार आहे. 18, 19 आणि 20 ऑगस्ट या तीन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे.
हा पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि खानदेश या सर्व भागांमध्ये होणार असून, विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा वेगही अनुभवायला मिळेल. नदी-नाल्यांना अचानक पाणी येऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
21 ऑगस्टपासून पाऊस कमी, ऊन पडणार
21 ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होऊन राज्यभरात सूर्यदर्शन होईल. 21 ते 25 ऑगस्ट या पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी उत्तम संधी मिळणार आहे.
या काळात शेतकऱ्यांनी फवारण्या कराव्यात, खत घालून घ्यावेत आणि पिकांची योग्य निगा राखावी.
पुन्हा 26 ऑगस्टला पावसाचे आगमन
26 ऑगस्टपासून पुन्हा राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे पुढील कामे आधीच आटोपून घ्यावीत.
शेतकऱ्यांसाठी खास सूचना
- धरणातून पाणी सोडले जाऊ शकते, त्यामुळे शेतातील मोटर, पाईप व इतर साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
- स्वतःची व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी.
- नदी-नाल्याजवळ अनावश्यक वावर टाळावा.
हा अंदाज लक्षात घेऊन योग्य वेळी शेतीची कामे केल्यास पिकांचे नुकसान टाळता येईल.