
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना
नमस्कार मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक योजना ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ नावाने व्हायरल होत आहे. या योजनेत दर महिन्याला 4000 रुपये मिळतील असा दावा केला जात आहे.
या योजनेत असे सांगितले जात आहे की, 1 मार्च 2020 नंतर एका किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या आणि 18 वर्षांखालील मुलांना राज्य सरकारकडून 4000 रुपये दिले जातील. काही पोस्टमध्ये शाळेचा शिक्का व मोबाईल नंबरसह अर्जाचा फोटोही शेअर केला जात आहे.
ही योजना खोटी आहे!
सदर योजना ही फेक (खोटी) आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात कोणताही जीआर (शासकीय आदेश) काढलेला नाही. या योजनेचे खरे नाव मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना (मध्यप्रदेश) असून, ती फक्त मध्यप्रदेश राज्यात लागू आहे.
कोल्हापूर इचलकरंजीमधील एका शाळेने चुकीची माहिती सही व शिक्क्यासह बोर्डावर लावली होती. त्यामुळे पालक गोंधळात पडले. जिल्हा महिला व बालविकास विभागाने तपासणी केल्यानंतर ही माहिती खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील खरी योजना – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना
महाराष्ट्र शासनाची खरी योजना म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना. ही योजना पूर्वी बाल संगोपन योजना म्हणून ओळखली जात होती आणि 30 मे 2023 रोजी यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना व जीआर काढण्यात आला.
या योजनेत कोण पात्र आहे?
- अनाथ, निराधार, बेघर, गंभीर आजाराने ग्रस्त पालकांची मुले
- कैद्यांची, एचआयव्ही ग्रस्तांची, कॅन्सरग्रस्तांची मुले
- भिक्षा मागणारी, मतिमंद किंवा दिव्यांग बालके
- फक्त एक पालक असलेली, घटस्फोटित किंवा विभक्त पालकांची मुले
या योजनेअंतर्गत लाभ:
- पात्र बालकांना दर महिन्याला 2250 रुपये मिळतात
- पूर्वी ही रक्कम 1100 रुपये होती, आता वाढवण्यात आलेली आहे
अर्ज प्रक्रिया व अधिक माहिती:
अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि अधिक माहिती सविस्तरपणे शासनाच्या अधिकृत जीआरमध्ये दिली आहे.
अफवांना बळी पडू नका
मित्रांनो, अशा खोट्या योजनांना बळी पडू नका. फक्त सरकारी संकेतस्थळावरून आणि अधिकृत सुचनांवरच विश्वास ठेवा.
हा लेख व माहिती आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना, पालकांना आणि शाळांपर्यंत नक्की शेअर करा.
धन्यवाद!