मका पिकासाठी उत्तम Top 2 तणनाशक कोणते? झटपट रिझल्ट

20250709 1354163436665043218583112

शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात यावर्षी मक्याची लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र यासोबतच गवताचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. गवतामुळे मका उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. म्हणून योग्य तणनाशकाचा वापर हा अत्यावश्यक आहे.

प्रभावी तणनाशके आणि त्यांचा वापर

1️⃣ टिंजर (BASF Tynzer) – घटक : Topramezone 33.6%

डोस: ३० मिली प्रति एकर

फवारणी पद्धत: १० लिटर पाण्यात ३० मिली टिंजर मिसळा, प्रत्येक १५ लिटरच्या पंपासाठी १ लिटर वापरा.

हे पण वाचा:
20250824 1210186812619970215000154 भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू | Bandhkam Bhandi Vatap Yojana 2025

टीप: ट्रॉपझोन असलेलं कोणतंही तणनाशक चालेल.

2️⃣ कॅलरीज एक्स्ट्रा (Calaris xtra) – कंपनी: Syngenta

डोस: १४० मिली प्रति एकर

फवारणी पद्धत: ९ लिटर पाण्यात १४० मिली मिसळा, १० टाक्यांसाठी फवारणी करा.

हे पण वाचा:
20250823 123105965675475646624786 पीएम किसान व नमो शेतकरी थकीत हप्ते येणार? 18,000+12,000 रुपये क्रेडिट अपडेट 2025

लव्हाळा साठी तणनाशक

सॅमप्रा (Dhanuka Sempera) – घटक: हॅलोफन मिथाईल (Halosulfuron-methyl)
डोस: ३.६ ग्रॅम प्रति १५ लिटर पंप

वापर: टिंजर/कॅलरीज एक्स्ट्रासोबत मिसळून लवळीच्या ठिकाणी फवारणी करा.


तणनाशक फवारणीचे महत्वाचे नियम

  • पाण्याचा pH: 6.5 ते 7 दरम्यान असावा. pH बॅलन्सर वापरावा.
  • गवताची अवस्था: 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असलेले गवतच योग्यरित्या जळते.
  • उच्च वाढलेलं गवत: यावर तणनाशकाचा परिणाम कमी होतो.

तणनाशकाचा योग्य वापर केल्यास मका पिकातील उत्पादनात वाढ होऊ शकते. वरीलपैकी कोणतेही घटक असलेले तणनाशक घ्या आणि सुचवलेली मात्रा वापरा. पाण्याचा दर्जा व गवताची अवस्था तपासूनच फवारणी करा

हे पण वाचा:
20250821 1330353530381352334124443 किसान क्रेडिट कार्ड मोहीम 2025: शेतकऱ्यांसाठी Online Loan Apply | फक्त 1 रुपयात पीक कर्ज

ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा.

Leave a Comment