
पोकरा 2.0 – 8 जुलै 2025 रोजी राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA टप्पा 2) साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, याची अंमलबजावणी येत्या 2025-26 पासून पुढील 6 वर्षांपर्यंत केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून, 70% निधी (4200 कोटी) जागतिक बँकेकडून कर्ज स्वरूपात आणि 30% निधी (1800 कोटी) राज्य शासनाकडून दिला जाणार आहे.
पोकरा 2.0 योजनेचे प्रमुख मुद्दे
- योजना नाव: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प – टप्पा 2 (POCRA 2)
- शासन निर्णय दिनांक: 8 जुलै 2025
- गावे: 7201 गावे निवडण्यात आली
- अंमलबजावणी कालावधी: 2025-26 पासून पुढील 6 वर्षे
- एकूण गुंतवणूक: ₹6000 कोटी
- DBT (थेट लाभ हस्तांतरण): लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यावर
समाविष्ट जिल्हे (21):
बुलढाणा, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, धाराशीव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
लाभार्थी पात्रता:
- 5 हेक्टर पर्यंत जमीनधारक शेतकरी
- स्वसहायता गट, शेतकरी गट, एफपीओ
- हवामान अनुकूल बियाणे उत्पादन घटकासाठी जमीन मर्यादा लागू नाही
अर्ज प्रक्रिया व अपडेट
- अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार
- फार्मर आयडी बंधनकारक
- अर्जासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू होणार
- पोर्टलवर लॉगिनसाठी आणि नोंदणीसाठी फार्मर आयडी आवश्यक
- लाभार्थ्यांची सर्व प्रक्रिया डिजिटल स्वरूपात पार पाडली जाणार
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे. या योजनेअंतर्गत शाश्वत शेती, हवामान अनुकूल उत्पादन, शेतीक्षेत्रातील सुधारणा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे यासाठी हे टप्पा 2 चे कार्य सुरू होणार आहे.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आयडी तयार करून ठेवावेत व पुढील अपडेटसाठी आपल्या जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
या योजनेबद्दलची अधिकृत माहिती, अर्ज लिंक, मार्गदर्शक तत्त्वे यासारख्या सर्व अपडेटसाठी आमच्या वेबसाइटवर वेळोवेळी भेट देत राहा.