
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 7 जुलै 2025 रोजी पंजाब डख यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे.
संपूर्ण राज्यात आजपासून पावसाची सुरुवात होत असून पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहेत.
कोणत्या भागात किती पाऊस?
✅ पूर्व विदर्भ (7-10 जुलै):
वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ
जोरदार पाऊस, पिकांसाठी जीवदान!
पश्चिम विदर्भ:
अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा
7 जुलै ते 10 जुलै दरम्यान पावसाचा अंदाज
मराठवाडा:
नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर
7 जुलै रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होणार
पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना विशेष दिलासा
लातूर, धाराशिव, बार्शी, नगर (7-10 जुलै):
विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असला तरी पिकाला उपयुक्त
अहिल्यानगर जिल्हा (7-11 जुलै):
पाऊस जोरात पडेल, पिकाला जीवदान
उत्तर महाराष्ट्र (धुळे, जळगाव, नंदुरबार) (7-10 जुलै):
रोज वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर
कोकण :
साताऱ्यापासून नाशिकपर्यंत जोराचा पाऊस राहणार, म्हणून नाशिककडे नद्यांना पूर येणार ते पाणी पैठणकडे येणार, धरणाची पातळी वाढणार.
🚨 विशेष माहिती:
नाथसागर जलाशय 10 जुलैपर्यंत 50% पातळी गाठणार अशी शक्यता होती.
आजच 52% भरले गेले! 20 जुलैपर्यंत 65% पातळी पार होईल.
पुढील टप्पा
11 जुलै पासून राज्यात सूर्यदर्शन घडणार आहे.
17 जुलै ते 30 जुलै दरम्यान पावसाचे नवीन चक्र येणार, मात्र हा पाऊस मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रात पडेल.
🔔 शेवटी महत्वाचे
अचानक वातावरणात बदल झाला, तर त्वरित नवा मेसेज दिला जाईल
शेतकऱ्यांनी हा अंदाज नक्की लक्षात ठेवावा, धन्यवाद.