
👨🌾 नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत – PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना.
या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 म्हणजेच एकूण मिळून ₹12,000 पर्यंत थेट बँक खात्यावर अनुदान दिले जाते. मात्र सध्या अनेक शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत.
जर तुमचं देखील हप्ता थांबलेला असेल, तर हा ब्लॉग खूप महत्त्वाचा आहे. खाली दिलेल्या 14 कारणांपैकी एक किंवा अधिक कारणांमुळे तुमचा हप्ता थांबलेला असू शकतो. चला जाणून घेऊया ही कारणं आणि त्यावरचे उपाय.
✅ 1. जमिनीचे प्रमाणीकरण (Land Seeding) न झालेलं
➡ महसूल विभागाशी संपर्क साधून लँड सीडिंग करून घ्या.
✅ 2. ई-केवायसी (e-KYC) न केलेली
➡ स्वतः ऑनलाइन किंवा CSC/कृषी सहाय्यकांच्या मदतीने पूर्ण करा.
✅ 3. बँक खाते आधारशी लिंक नसणे
➡ तुमचं बँक खाते आधारशी लिंक करा किंवा पोस्टात DBT-enabled खाते उघडा.
✅ 4. DBT एनाबल नसलेलं बँक खाते
➡ बँकेमध्ये जाऊन DBT सुविधा सुरू करा किंवा पोस्ट खातं उघडा.
✅ 5. बँक खाते बंद असणे
➡ बंद असलेलं बँक खाते पुन्हा सुरू करा किंवा नवीन खाते उघडा.
✅ 6. दुसऱ्याचं आधार लिंक असलेलं बँक खाते
➡ बँकेत जाऊन चुकीचं आधार लिंक दुरुस्त करून घ्या.
✅ 7. नोंदणी नंतर आधारमधील दुरुस्ती न करणे
➡ आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख इ. माहिती दुरुस्त करा.
✅ 8. आयकर (ITR) भरलेल्यांसाठी अपात्रता
➡ योजना केवळ बिगर करदात्यांसाठी आहे. ITR भरल्यास हप्ता बंद होतो.
✅ 9. योजना स्वेच्छेने सरेंडर केलेली
➡ योजना एकदा सरेंडर केल्यास पुन्हा लाभ मिळत नाही.
✅ 10. चुकीने अपात्र ठरवले जाणे
➡ सगळे पुरावे आणि कागदपत्र घेऊन तहसील कार्यालयात संपर्क करा.
✅ 11. लाभार्थी मयत झालेला असल्यास
➡ लाभार्थी मयत झाल्यास त्यानंतर लाभ बंद होतो.
✅ 12. नोंदणीनंतर जमीन विक्री केलेली
➡ जमीन विक्रीनंतर योजना अपात्र होते.
✅ 13. बँकेकडून ट्रान्झॅक्शन फेल होणे
➡ बँकेत जाऊन व्यवहार अडथळ्याची चौकशी करा किंवा पोस्ट खातं उघडा.
✅ 14. फार्मर आयडी कार्ड न घेतलेले
➡ नवीन नियमांनुसार Farmer ID Card अनिवार्य झाले आहे. लवकरात लवकर काढा.
वरील 14 कारणांपैकी कोणतं कारण तुमच्यावर लागू होतंय ते तपासा.
त्यावर दिलेले उपाय करून हप्ता पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया शक्य आहे.
👉 शेवटी एकच विनंती – हा लेख आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा.
जय हिंद! जय महाराष्ट्र!