
आज आहे 5 जून 2025, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे.
हवामान अंदाज – पंजाब डख
तुम्ही 6 जून पर्यंत तुम्ही शेतीची कामे करून घ्या, कारण कि राज्यामध्ये 7,8,9,10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे, जोराचा पडणार आहे, म्ह्णून हा अंदाज लक्षात घ्यावा.
पण 7,8,9,10 जूनला प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि हा पाऊस पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी,खान्देश,मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे.
त्यानंतर 13,14,15,16,17 जून दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे.
राज्यात आज 5 जूनपासून बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे, 6 जुनला आणखी खूप ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे, 7 ला अजून भाग व्यापणार आहे,8,9,10,11,12 वाढत वाढत जाणार.
पाऊस आता हळूहळू सुरु झाला आहे, म्ह्णून हे लक्षात घ्यायचं, पण 7,8,9 ला जास्त पडणार आहे, १३ ते १८ जून खूप जास्त पाऊस पडणार आहे.
ज्या शेतकऱ्यांचे शेत दुरुस्त करायचे आहे, अजून २-३ दिवस राहिले आहे, तुम्ही या २-३ दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या.
राज्यात आज 5 जून पासूनच बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे,6,7,8,9,10,11 असा पाऊस पडताच राहणार आहे, दररोज वेगवेगळा भाग पडत जाणार, धन्यवाद.