
नमस्कार शेतकरी मित्रांनो
13-15 जुलै 2025 – विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस
- लातूर, बीड, सोलापूर, नगर, परभणी, जालना, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका व भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता.
- पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या भागांत पावसाची स्थिती सुरूच राहील.
17-20 जुलै – पावसाचा दुसरा टप्पा सुरू
तामिळनाडू, कर्नाटक व आंध्रप्रदेशात पाऊस सक्रिय होत असून, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर 18 जुलैनंतर जाणवेल.
- लातूर, बीड, सोलापूर, धाराशिव, नगर, सांगली, जत, पंढरपूर,कडा आष्टी,पाटोदा या भागात 18 जुलैनंतर पावसात वाढ होईल.
- 20 जुलैपासून पाऊस वाढत जाणार.
जायकवाडी धरण – मराठवाड्यासाठी आनंदवार्ता
जायकवाडी धरण 70% भरले असून जुलैच्या शेवटी 100% होण्याची शक्यता आहे. हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.
पेरणीसाठी योग्य वेळ
पूर्व विदर्भात पेरण्या उशीराने झाल्या असून 13 ते 18 जुलै दरम्यान उन्हाचा चांगला कालावधी उपलब्ध असेल. शेतकरी या वेळेत फवारणी, खुरपणी किंवा पेरणी पूर्ण करून घ्याव्यात.
24 जुलैनंतर – राज्यभर पावसाचा जोर
24 जुलै 2025 नंतर महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये चांगला पाऊस होईल. त्यामुळे पिकांमध्ये भरभराटीची शक्यता आहे.
राज्यात दुष्काळाची शक्यता नाही. पाऊस जरी काही भागात उशिरा आला असला तरी 18 जुलैनंतर संपूर्ण राज्यात समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज आहे,धन्यवाद.