मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून रक्षाबंधनाची खास भेट – जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात!

mazi-ladki-bahini-yojana-july-hafta-rakshabandhan

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून रक्षाबंधनाची खास भेट

नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत पात्र महिलांना रक्षाबंधनाची खास भेट म्हणून जुलै महिन्याचा सन्मान निधी रु. 1500 लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार हप्ता

या योजनेबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आली आहे. या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधनाच्या पूर्वीच हा हप्ता जमा केला जाईल.

हे लक्षात घ्या की हा 1500 रुपयांचा हप्ता जुलै महिन्याचा आहे. हा हप्ता एक्स्ट्रा दिला जात नाही, तर जुलै महिन्याचा नियमित सन्मान निधी आहे जो सणाच्या पार्श्वभूमीवर लवकर दिला जात आहे.

हे पण वाचा:
20250824 1210186812619970215000154 भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू | Bandhkam Bhandi Vatap Yojana 2025

कोणती प्रक्रिया होणार?

  • सन्मान निधी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे खात्यात जमा होईल.
  • सर्व पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • ही योजना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, श्री एकनाथ शिंदे, आणि श्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने राबवली जात आहे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना रक्षाबंधन सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे, धन्यवाद.

Leave a Comment