
शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रात मका पिकाची लागवड करणार असाल आणि चांगले उत्पादन मिळवायचे असेल, तर योग्य बियाण्याची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला 2025 सालासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 10 मका बियाण्याच्या वाणांची माहिती देणार आहोत, जे विविध जिल्ह्यांमध्ये चांगले उत्पादन देतात.
मका बियाण्याची निवड करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
- नारंगी रंगाचे दाणे असलेल्या वाणांना बाजारात जास्त मागणी असते.
- 100 दाण्यांचे वजन जास्त असणे फायदेशीर ठरते.
- मध्यम ते लांब कालावधीचे वाण 110-120 दिवसामध्ये काढणीस तयार होतात.
- एक समान, पूर्ण भरलेले कणीस हे दर्जेदार बियाण्याचे लक्षण असते.
टॉप 10 हायब्रिड मका बियाण्याचे वाण
1. एडवांटा सीड्स 741 – Advanta Seeds
महाराष्ट्रात भरपूर वर्षांपासून या वरायटीची डिमांड पाहायला मिळते.
- कालावधी: 110-120 दिवस
- वैशिष्ट्य: लांब आणि मजबूत कणस, नारंगी दाणे
- योग्य भाग: महाराष्ट्र, मध्यप्रदेश
2. PAC 759 – Advanta Seeds
या वर्षी याच थोडं शॉर्टेज असू शकत, कारण डिमांड जास्त आहे व कंपनीचा पुरवठा कमी असल्याचं पाहायला मिळत.
- कालावधी: 110-120 दिवस
- वैशिष्ट्य: एकसमान भरलेलं कणस
- रंग: आकर्षक नारंगी
3. सिजेंटा 6802 – Syngenta Seeds NK 6802
- वैशिष्ट्य: आकर्षक नारंगी दाणे, लांब कणीस समान भरलेले
- योग्य भाग: हरियाणा,पंजाब,महाराष्ट्र
4. बाजीराव – Patil Biotech
- कालावधी: 115 ते 120 दिवस
- वैशिष्ट्य: 16-20 ओळीचे पूर्ण भरलेले कणस
5. पायनर 3502 – Pioneer Seeds
या वाणाची एकरी झाडांची संख्या जास्त ठेवता येते, तुमची जर हलकी जमीन असेल तर, तेथे सुद्धा या वरायटीचा विचार करू शकता.
- कालावधी: 115-120 दिवस
- वैशिष्ट्य: मध्यम उभारी जमीनसाठी उपयुक्त
6. सिजेंटा 7720
- वैशिष्ट्य: खरीप आणि रब्बी दोन्हीसाठी योग्य,एकसमान दाण्याचा आकार
- कालावधी: 110-120 दिवस
7. हायटेक 5016 – HiTech Seeds
- कालावधी: 105-115 दिवस
8. सिजेंटा 6668
- कालावधी: 80-90 दिवस
- वैशिष्ट्य: लवकर काढणी, आकर्षक रंग,खरीप व रब्बी दोन्ही हंगामासाठी चालते.
9. मायको 4065 – Mahyco Seeds
- वैशिष्ट्य: मध्यम पिवळसर ते नारंगी रंगाचे दाणे
- कालावधी: 4-5 महिने
- कालावधी: 150-165 दिवस
10. राशी 3499 – Rasi Seeds
लवकरात लवकर काढायला आलेली पाहायला मिळते.
- कालावधी: 110-120 दिवस
- वैशिष्ट्य: लवकर काढणी, नारंगी व मध्यम पिवळसर दाणे
स्वीट कॉर्नसाठी खास वाण
- शुगर 75 – Syngenta
- मिठास
- स्वीट 16 – Pyramid Seeds
- मधुर – Know you Seeds
- हायब्रिक 39 -HI-BRIX 39
शेतकरी मित्रांनो, वर दिलेले सर्व वाण 2025 च्या हवामान व उत्पादन स्थितीनुसार योग्य आहेत. नारंगी रंगाच्या दाण्यांचे वाण ही सध्या बाजारात अधिक फायदेशीर ठरतात. योग्य वाणांची निवड करून तुम्ही तुमच्या शेतात अधिकतम उत्पादन मिळवू शकता,धन्यवाद.