
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे २९ जून २०२५.
राज्यामध्ये नगर जिल्हा,धाराशिव,बीड,लातूर,परभणी जिल्ह्याचा काही भागात काही दिवसापासून पाऊस पडलेला नाही , त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, आज नगर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली दिसेल, ३० जूनला अजून वाढणार.
१ ,२ ,३ जुलैला अहिल्यानगर,धाराशिव,लातूर,बीड या भागात पाऊस पडलेला दिसेल.
विदर्भ अंदाज
विदर्भातील शेतकऱ्यांना सांगू इछितो, नागपूर,वर्धा, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर,यवतमाळ,अकोला,वाशीम,हिंगोली,बुलढाणा,जळगाव या भागात २९ जूनला म्हणजे आज पाऊस पडणार, परंतु १ ,२ ,३ जुलैला मुसळधार पाऊस पडणार.
पूर्व विदर्भ ६ जिल्हे आणि पश्चिम विदर्भ ५ या १ १ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, कुठं अतिवृष्टी होणार, कुठं भाग बदलत पाऊस पडणार,कुठं रिमझिम पडणार.
यवतमाळ,चंद्रपूर,नागपूर,अमरावती,अकोला,वाशीम,हिंगोली,बुलढाणा,जळगाव जिल्ह्यामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे, म्हणून जालना,छत्रपती संभाजीनगर पाऊस देखील पडणार. सोलापूर
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात आज सांगली,सातारा, पंढरपूर,नगर,धाराशिव जिल्ह्यात पाऊस सुरु होणार,सोलापूरकडे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्राकडे नाशिक जिल्ह्याकडे जोरदार पाऊस सुरु राहणार, धुळे,नंदुरबार,जळगाव,चाळीसगाव,पारोळा या ठिकाणी देखील २९ जुपासुन ३ जुलैपर्यंत जोराचा पाऊस राहणार.
कोकणपट्टी आणि घाट माथ्यावरील भागातील सर्व जनतेला सांगू इच्छितो, पाऊस कायम चालूच राहणार, बंद होणार नाही.
२ ९ जूनपासून ते ३ जुलै पर्यंत गुजरात,मध्यप्रदेश,राज्यस्थान पाऊस पडत असल्यामुळे त्याचा असर आपल्या महाराष्ट्रावर होणार.
५ ,६ ,७ जुलै दरम्यान परत भाग बदलत पाऊस येणार.
१० ते १ ५ जुलै २०२५ देखील भाग बदलत पाऊस असणार.
खंड पडणार नाही
राज्यामध्ये एकदम १५ -२० दिवसाचा खंड पडणार नाही, पाऊस भाग बदलत येतच राहणार, धन्यवाद.