
आजपासून परत शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे, राज्यामध्ये सध्या सर्वोदोर पाऊस नाही, फक्त राज्यात भाग बदलत पाऊस पडणार.
या भागात पाऊस चालू राहील
कोकणपट्टीला मात्र सांगली,सातारा,सोलापूर,कोल्हापूर, पुणे, नाशिकपर्यंत सरी राहणार आहेत, तिकडचा पाऊस चालूच राहील.
राज्यात सर्वोदोर मोठा पाऊस नाही, भाग बदलत पडणार आहे, सरी येणार आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा
या जिल्हात पाऊस
आज आहे 21 जून 2025.
२१ ,२२ आणि २३ जून दरम्यान जळगाव,संभाजीनगर,जालना,बुलढाणा,अकोला,अमरावती,वर्धा,भंडारा, यवतमाळ जिल्हा, वाशीम,हिंगोली, नांदेड जिल्हा या भागामध्ये आज उद्या आणि परवा सारिओसरी येणार आहे, म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल उद्या थोडा येणार आहे.
परंतु सर्वोदोर पडणार नाही, जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये पडेल काही भागांमध्ये पडणार नाही.
23,24 आणि 25 जून दरम्यान धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड,बीड या भागांकडे पाऊस असणार आहे, बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे.
21 जून पासून ते 26 जूनपर्यंत असाच पाऊस असणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा राहणार आहे सगळीकडे पडणार नाही.
वारे कधी बंद होणार ?
आता चालू असलेल वार काही ठिकाणी २ ५ जूनला बंद होईल काही ठिकाणी २ ६ जूनला बंद होईल आणि हे वार बंद झाल्याच्या नंतर चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे.
मराठवाड्यामध्ये 25,26 जूनपर्यंत असच वार चालू राहील, 26 नंतर वार बंद होईल, धन्यवाद.