
शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंतचे अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
या योजनेअंतर्गत “प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर निवड केली जाणार आहे.
योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये:
- आंबा, संत्रा, डाळिंब, चिकू, पेरू, अंजीर, बदाम, नारळ, सीताफळ, फणस, लिंबू, कोकम इत्यादी अनेक फळपीकांची लागवड करता येते.
- प्रती हेक्टर अनुदान मिळण्याची रक्कम निश्चित, याचा सविस्तर चार्ट उपलब्ध.
- योग्य अंतर व क्षेत्रानुसार लागवड केल्यास अधिक लाभ.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया (Step-by-step):
- अधिकृत वेबसाइटवर जा.
- “वैयक्तिक शेतकरी” पर्याय निवडून, फार्मर आयडी व OTP टाकून लॉगिन करा.
- फार्मर आयडी माहित नसेल तर शोधण्यासाठी पर्याय दिलेला आहे.
- लॉगिन केल्यानंतर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- खाली स्क्रोल करत “फलोत्पादन” > “भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना” निवडा.
- त्यानंतर:
- 🌳 पीक निवडा (उदा. आंबा, डाळिंब इ.)
- 📏 पिकांमधील अंतर (उदा. 10×10 किंवा 5×5)
- 🧭 क्षेत्रफळ (हेक्टर/गुंठा) भरा
- सर्व माहिती भरून “जतन करा” वर क्लिक करा.
- अर्ज सादर करताना अटी व शर्ती स्वीकारा.
- फी भरावी लागल्यास ₹23 Google Pay/PhonePe/UPI/कार्डने पेमेंट करा.
- अर्ज झाल्यावर “लागू केलेले घटक” मध्ये अर्जाची माहिती पाहता येईल.
- पावती डाऊनलोड करून ठेवा.
महत्त्वाच्या टीपा:
- लवकर अर्ज करा – प्रथम अर्ज करणाऱ्यांनाच प्राधान्य.
- क्षेत्र भरताना कोकण विभागासाठी मर्यादा 10 हेक्टरच्या आत आहे.
- सर्व माहिती नीट तपासून भरावी.
शेतकरी बंधूंनो,
ही योजना तुमच्या बागायती भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.
जय जवान, जय किसान!
जय महाराष्ट्र!