Hawaman andaj : मुसळधार पावसाचा इशारा! कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होणार ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा हवामान अंदाज घेऊन आलो आहे.

panjab-dakh-hawaman-andaj-maharashtra-26525

26 मे ते 31 मे 2025 जोरदार पाऊस – पंजाब डख

राज्यात 26 मे 2025 पासून 31 मे 2025 पर्यंत दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, काही भागांत मुसळधार, अति मुसळधार आणि काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होईल.

चारही विभाग पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र तसेच कोकण पट्टी, खानदेश आणि मराठवाडा सर्वत्र पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा:
20260110 2252028062787346631473101 ⚠️ Maharashtra Weather Alert: 11–14 जानेवारी पावसाचा अंदाज | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती – panjab dakh

आनंदाची बातमी

केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे आणि येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातही दाखल होईल. अनेक ठिकाणी शेतीची पूर्वतयारी पूर्ण असून काही ठिकाणी तण उगवलेले आहे, त्यांनी शेत दुरुस्त करावे.

पाऊस कधी उघडणार ?

1 जून ते 7 जून 2025 दरम्यान राज्यात पाऊस विश्रांती घेणार, त्यामुळे या कालावधीत चांगले सूर्यदर्शन होणार आहे. शेतकऱ्यांनी या वेळेचा उपयोग करून शेतीची कामे पूर्ण आटपून घ्या.

ज्याची जमीन तयार आहे, ओलसर आहे, तर कापसाची लागवडही सुरू करू शकता. मात्र, पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा आणि जमिनीतील ओल तपासूनच पुढील पाऊल टाकावे.

हे पण वाचा:
20260108 2121198184603740889957203 आजचा हवामान अंदाज – पंजाब डख । 8 जानेवारी 2026

या भागांमध्ये जोरदार पाऊस

31 मे 2025 पर्यंत मुंबई,पुणे,नाशिक,दौंड,बीड जिल्हा,कडा आष्टी या भागात मुसळधार पाऊस पडणार, सातारा, सांगली,सोलापूर देखील खूप पाऊस पडणार, म्ह्णून हे लक्षात घ्यावे .

प्रत्येक नदीला,नाल्याला पाणी येईल असा पाऊस पडणार आहे.

ज्यांचे शेत दुरुस्त करायचे राहिले, ज्यांचे भुईमूग काढायचे राहिले, त्यांनी 1 जून 2025 नंतर ऊन पडणार आहे, तेव्हा आपली कामे करून घ्या.

हे पण वाचा:
20251230 2016096799837629507616535 आजचा हवामान अंदाज । 2026 मध्ये दुष्काळ ? – पंजाब डख

सर्वाना विनंती

शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनीचे स्वरूप, ओल आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून पेरणीचा निर्णय घ्यावा.

जो पर्यंत शेतकऱ्यांची पेरणी होत नाही, तोपर्यंत दररोज नवा हवामान अंदाज दिला जाईल. अंदाजासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा, धन्यवाद.

हे पण वाचा:
20251215 2229205661284116872685491 आजचा हवामान अंदाज । पंजाब डख – 15 december 2025

Leave a Comment