
आजचा हवामान अंदाज
आज आहे 15 डिसेंबर 2025.
15 डिसेंबर पासून 30 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यात कसलाही पाऊस येणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.
फक्त थंडीची लाट राहणार, थंडी वाढतच जाणार.
पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी,खान्देश,मराठवाडा सगळीकडे तीव्र थंडीची लाट येणार.
30 डिसेंबर पर्यंत संपूर्ण भारतात थंडीची लाट राहणार.
निफाड,पुणे,परभणी या पट्ट्यात काही ठिकाणी पारा कुठं ७ कुठं ८ कुठं ९ अंशावर जाणार आहे
जानेवारी 2026 मध्ये देखील थंडीची खूप चाहूल राहणार.
उत्तरेकडून वारे येणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.