
नमस्कार आज आहे २ ऑगस्ट २०२५.
८ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या, कारण राज्यामध्ये ८ तारखेला रात्री पावसाला सुरुवात होणार, ९ ला वाढत जाणार.
९ ऑगस्टला कर्नाटक,तेलंगणा,सांगली,सातारा,सोलापूर,कोल्हापूर,धाराशिव,बीड,आहिल्यानगर,कोकणपट्टी,पुणे,परभणी,लातूर,नांदेड,यवतमाळ,हिंगोली या भागात सुरुवात होणार आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक,चाळीसगाव,कळवण,निफाड,नाशिक,लासूर या भागात ९,१०,११ ,१२,१३ ऑगस्ट दरम्यान पाऊस येणार.
विदर्भ
विदर्भाकडे ९ तारखेनंतर १० ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भाकडे चांगला पाऊस येणार आहे.
पूर्व विदर्भाकडे नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर,यवतमाळ,अमरावती या भागाकडे १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान तुमच्या भागाकडे चांगला पाऊस.
पश्चिम विदर्भाकडे बुलढाणा,अकोला,यवतमाळ,वाशीम,अमरावती या ५ जिल्ह्यामध्ये ९ तारखेपासून ते १२ तारखेदरम्यान वेगवेगळ्या भागात दररोज पावसाची हजेरी लावणार, पिकाला जीवदान ठरणार पाऊस पडणार.
मराठवाडा
मराठवाड्याकडे नांदेड,हिंगोली,लातूर,धाराशिव,परभणी,बीड,जालना,छत्रपती संभाजीनगर या भागाकडे ८ तारखेला मध्यरात्री पाऊस सुरु होणार, ९ तारखेपासून चांगला पाऊस येईल.
अक्कलकोट,जत,मंगसुळी,उदगीर,देगलूर,उमरगा,कंदाल,सगरोळी,बिलोली,धर्माबाद,आदिलाबाद या भागाकडे ७ तारखेला संध्याकाळी पावसाचं वातावरण तयार होणार.
राज्यात सगळीकडे ९ ऑगस्ट २०२५ पासून चांगली सुरुवात होणार आहे.
या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त जास्त असणार आहे, विजा कडकडाट असताना झाडाखाली थांबू नका, झाडावर जास्त विजा पडतात, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा, धन्यवाद.