
नमस्कार लाडक्या बहिणींनो!
तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडकी बहिण योजना – जून 2025 चा हप्ता पुन्हा खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
🔔 काय घडलं होतं?
- 5 जुलैपासून काही जिल्ह्यांमध्ये हप्त्यांचे पैसे जमा होऊ लागले होते.
- रविवारी अचानक पैसे येणे थांबले. कोणालाही पैसे मिळाले नाहीत.
- मात्र आता 8 जुलै सोमवारपासून पुन्हा हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
पैसे कधी मिळणार ?
अनेक बहिणींना आज सकाळपासून पैसे मिळायला सुरुवात झाली आहे, ₹1500 हप्ता थेट बँक खात्यात जमा झालेला आहे.
एअरटेल पेमेंट बँक, इतर बँकांमध्ये सुद्धा पैसे जमा होत आहेत.
वेळेप्रमाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सकाळी 5, 7, 8 वाजता हप्ते जमा झाल्याचे आढळले आहे.
पुढील 2–3 दिवसांमध्ये पैसे मिळणार
टप्प्याटप्प्याने उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा हप्ते मिळतील.
आज, उद्या आणि परवा या तीन दिवसांत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत, टेन्शन घेऊ नका, आपलाही हप्ता लवकरच जमा होईल.
लाडक्या बहिणींनो, ही योजना तुम्हा सर्वांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.
ज्यांचं अजून हप्ता आलेला नाही त्यांनी थोडी प्रतीक्षा करावी – लवकरच पैसे जमा होतील.