शेतकऱ्यांसाठी 100% अनुदान ! पाईपलाईन अनुदान योजना 2025: संपूर्ण माहिती

pipeline-anudan-yojana-maharashtra-2025-marathi

पाईपलाईन अनुदान योजना 2025 : नमस्कार मित्रांनो!

आज आपण पाईपलाईन अनुदान योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा, किती अनुदान मिळतं, कोण पात्र आहे आणि संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे – याबद्दल संपर्ण माहिती आपण पाहणार आहोत.


📌 पात्रता आणि अनुदान रक्कम

  • OPEN/OBC इत्यादी प्रवर्ग:
    • PVC पाईप: ₹35/मीटर
    • SDP पाईप: ₹50/मीटर
    • कमाल मर्यादा: 428 मीटर किंवा ₹15,000 पर्यंत
  • SC/ST प्रवर्ग:
    • 100% अनुदान
    • कमाल मर्यादा: ₹30,000 पर्यंत

पाईपलाईन अनुदान योजना अर्ज कसा करायचा ?

🔗 पोर्टल:

  • महाडीबीटी फार्मर पोर्टलवर लॉगिन करणे आवश्यक आहे.
  • Mahadbt Farmer Portal (लिंक)

👣 स्टेप बाय स्टेप अर्ज प्रक्रिया:

  1. लॉगिन करा:
    • Farmer ID टाका.
    • आधार लिंक मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.
  2. प्रोफाईल अपडेट करा:
    • प्रोफाईल 100% पूर्ण करा.
  3. नवीन घटकासाठी अर्ज करा:
    • घटकात सिंचन साधने व सुविधा निवडा.
    • त्याखाली PVC किंवा SDP पाईप निवडा.
    • 60 मीटर ते 428 मीटर पर्यंत माप निवडा.
    • (उदाहरण: 450 मीटर चालणार नाही)
  4. अटी शर्ती मान्य करा:
    • स्वयघोषणा (Declaration) टिका.
  5. बाब जतन करा:
    • एक किंवा अधिक घटक निवडू शकता.
  6. अर्ज सादर करा:
    • सर्व घटक एकत्रितपणे सादर करा.
  7. पेमेंट करा:
    • ₹23.60 पेमेंट करा.
    • पेमेंट झाल्यावर रिसीट प्रिंट करा.

अर्जाचा स्टेटस कसा पाहायचा?

  1. अर्ज सादर केल्यानंतर तो वेटिंग यादीत दाखवला जाईल.
  2. नंतर निवड यादीत नाव दाखवले जाईल.
  3. यादी पोर्टलवर पाहता येईल.

काही महत्वाच्या टीपा:

  • पूर्वी अर्ज केला असेल तर यादीत आपले नाव आहे का ते पहा.
  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर ही योजना चालवली जाते.
  • योग्य वेळेत अर्ज करा, अनुदानाचा लाभ मिळवा.

ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. योग्य प्रकारे आणि वेळेत अर्ज केल्यास आपल्याला मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो.

हे पण वाचा:
20250824 1210186812619970215000154 भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू | Bandhkam Bhandi Vatap Yojana 2025

Leave a Comment