शेतकऱ्यांसाठी खुशखबर – 100% बियाणे अनुदान योजना 2025 : अर्ज सुरु

नमस्कार शेतकरी मित्रांनो! खरीप हंगाम 2025 साठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत बियाणे अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला विविध पिकांच्या बियाणांवर अनुदान मिळणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया, शेवटची तारीख, पात्रता आणि वितरण पद्धतीची माहिती खाली सविस्तर दिली आहे.

Biyane-anudan-yojana-2025

अर्ज कुठे व कसा करायचा?

  • अर्ज महाडीबीटी पोर्टल (MahaDBT) वर ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • अर्ज करताना आपल्या सातबारा उताऱ्याचा आधार लागेल.

कोणत्या पिकांसाठी अनुदान उपलब्ध?

पीकवानाचे वयअनुदान दर (प्रमाणित बियाणे)
भात≤10 वर्षे₹20 प्रति किलो
भात>10 वर्षे₹10 प्रति किलो
तूर / मूग / उडीद≤10 वर्षे₹50 प्रति किलो
तूर / मूग / उडीद>10 वर्षे₹25 प्रति किलो
बाजरी / नाचणी≤10 वर्षे₹30 प्रति किलो

भात, तूर, मूग, उडीद, बाजरी यासाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही.


अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • 29 मे 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
  • बियाणे वितरणासाठी 1 ते 3 जून दरम्यान सोडत काढली जाईल.

100% अनुदान असलेली पिके (तेलबिया अंतर्गत योजना)

  • सोयाबीन, भुईमूग, कारळा यासाठी 5 वर्षाच्या आतील वान असलेल्या बियाण्यांवर 100% अनुदान दिले जाईल.
  • प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1 हेक्टरच्या मर्यादेत लाभ दिला जाईल.
  • या योजनेसाठी देखील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल.

निवड झाल्यावर काय करावे?

  • निवड झालेल्या लाभार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवला जाईल.
  • शेतकऱ्यांनी आधार कार्ड व मोबाईलवरील निवडीचा मेसेज घेऊन तालुकास्तरावरील महाबीज वितरकाकडे जाऊन बियाण्याचे उचल करावे.
  • महाबीज वितरकांची यादी देखील तालुका स्तरावर प्रसिद्ध केली जाईल.

महत्त्वाची सूचना

  • ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर चालते, त्यामुळे अर्ज लवकर करा.

हे पण वाचा:
20250824 1210186812619970215000154 भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरू | Bandhkam Bhandi Vatap Yojana 2025

Leave a Comment