
आज आहे 16 जुलै 2025.
लातूर,परभणी,नांदेड,बीड,नगर जिल्ह्याचा काही भाग,सोलापूर,धाराशिव,जत,सांगली या पट्ट्यात मागच्या १५ -२० दिवसापासून काही भागात पाऊस पडलेलाच नाही, त्या शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज.
लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली,बीड,नगर जिल्हा,धाराशिव,सोलापूर,सांगली,जत या भागातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 16 जुलै ते 21 जुलै पर्यंत पाऊस पडणार.
दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडून जाईल,तुमचं पीक मात्र जाणार नाही, हा खास करून अंदाज.
पूर्व विदर्भात 16 जुलै पासून 21 जुलै पर्यंत चंद्रपूर,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,यवतमाळ,अकोला,अमरावती,बुलढाणा,वाशीम,जळगाव,जळगाव जामोद,घाटाच्या खाली,जालना या पट्ट्यामध्ये ३ -४ दिवसामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस.
आजचा हवामान अंदाज –
आज १६ जुलै २०२५ ला रात्री पूर्व आणि पश्चिम विदर्भात बऱ्याच ठिकाणी खूप चांगला पाऊस पडणार.
कोकणपट्टीचा पाऊस कायम राहणार, तो बंद होणार नाही.
नाशिक ,उत्तर महाराष्ट्रातील सारिओसरी चालूच राहतील.
16,17,18 जुलैला छत्रपती संभाजीनगर,जालना,आहिल्यानगर,जळगाव चांगला पाऊस असणार.
लातूर,बीड,परभणी,हिंगोली,नांदेड,धर्माबाद, बिलोली,नायगाव,निलंगा, बार्शी,अक्कलकोट,बिदर ह्या भागातील शेतकऱ्यांचे फोन येत होते, तुमच्याकडे ५ -६ दिवस चांगल्या प्रकारचा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार.
जुलै च्या शेवटच्या आठवड्यात परत राज्यात पावसाचं चांगलं वातावरण तयार होणार.