
आजचा हवामान अंदाज
नमस्कार आज आहे ३ जुलै २०२५.
आज ३ जुलैला रात्री विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार, परभणी,बीड,छत्रपती संभाजीनगर,लातूर,धाराशिव, सोलापूर कडे देखील पडणार, परंतु सर्वोदोर नसणार, भाग बदलत पडणार.
राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या ११ जिल्ह्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार, नंतर तो पाऊस हिंगोली कडे येईल परभणी,बीड,जालना,बुलढाणा,जळगाव या भागांमध्ये राहणार आहे.
10 जुलै 2025 पर्यंत असाच वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, सर्वोदोर पडणार नाही, म्हणून हे सर्वानी लक्षात घ्यावे.
जिकडे पाऊस पडला तिकडे पडणार ज्यांना सोडून दिले त्यांना सोडणार.
म्हणून जशी शेतीची कामे करायला वेळ असेल तशी कामे करून घ्या, राज्यात सध्यातरी सर्वोदोरच वातावरण नाही, भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार.
या भागात वरुणराजाची जास्त कृपा
जास्त वरुणराजाची कृपा नागपूर,वर्धा,भंडारा,यवतमाळ,अमरावती,अकोला,बुलढाणा,जळगाव,धुळे,नंदुरबार या भागात राहणार आहे.
राज्यातील वारे कशामुळे चालू आहे ?
३ कमी दाबाचे पट्टे नागपूर,वर्धा, भंडारा,अमरावती,बुलढाणा असं करत जळगाव, मध्यप्रदेश, राज्यस्थान कडे चालले आहे, तिकडे जात असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस सर्वोदोर नाही, ज्या वेळेस हे स्थिर होतील 7 जुलैला हे वारे बंद होईल.
10 जुलैच्या नंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल, धन्यवाद.